Ad will apear here
Next
वृद्धत्व आनंदी कसे करावे
एके काळी साठी पूर्ण करणाऱ्या माणसाचे कौतुक होत असे; पण आता माणसे सहजपणे ८० वर्षांपर्यंत जगतात; मात्र या काळात त्यांना आर्थिक, घरगुती, आरोग्य, वाहन चालविणे अशा अनेक बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यातून मार्ग काढत आनंदाने कसे जगावे, त्यासाठी काय पथ्ये व कुपथ्ये आहेत, याचे अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर व्यक्तींच्या लेखांचा संग्रह ‘वृद्धत्व आनंदी कसे करावे’ हा ज्येष्ठ साहित्यिक व करसल्लागार अरुण रामकृष्ण गोडबोले यांनी संपादित केला आहे. 

यातील विविध लेखांत आरोग्य, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक विषयांवर लेखकांनी ‘युक्तीच्या चार गोष्टी’ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही गोष्टी वृद्धत्वापूर्वी अंमलात आणण्याच्या व काही ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर बोलणे-वागणे व कृतीसाठी आहे. ज्येष्ठांचे ड्रायव्हिंग यावरील खास लेखही यात आहे. ज्येष्ठांना अतिशय उपयुक्त ठरणारे ३२ लेख यात आहेत ज्याद्वारे रडत कुढत जीवन जगण्यापेक्षा हसत खेळत कसे जगावे याची गुरुकिल्ली यात सापडते. 

पुस्तक : वृद्धत्व आनंदी कसे करावे
संपादक : अरुण रामकृष्ण गोडबोले
प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : १७८
किंमत : १८० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZKPBZ
Similar Posts
स्वर प्रभाकर गोवा ही कलेची भूमी आहे. या गोयंच्या मातीतून अनेक कलाकार घडले आहे. परिपूर्ण मैफलीचा आनंद त्यांच्या गाण्यातून मिळतो. कोणतेही सत्र असले, तरी मैफल रंगविण्यात त्यांची हातोटी आहे, अशी गुणवैशिष्ट्ये सांगत मंगला खाडिलकर यांनी पं. प्रभाकर कारेकर यांचा सुरेल जीवनप्रवास ‘स्वर प्रभाकर’मधून कथन केला आहे.
श्री मनाचे श्लोक एक मागोवा ‘आधी प्रपंच करा नेटका’ असे रामदास यांनी सांगितले आहे. समर्थ रामदास म्हणजे केवळ पारमार्थिक संत नव्हेत, तर समाज शिक्षक, कवी, उपदेशक, रामोपासक, कुशल संघटक आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ संत, असे त्यांचे व्यामिश्र व्यक्तिमत्त्व होते. माणसाचे आयुष्य सफल व्हावयाचे असेल, तर त्याचे मन ताब्यात हवे, म्हणूनच समर्थांनी मनाला उपदेश करणारे श्लोक लिहिले
सिनेमाचे दिवस चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊनसुद्धा त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहीत नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळिसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली
सिनेमाचे दिवस चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊन सुद्धा तो लागल्यावर त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहित नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळीसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language